दररोज एकशे पाच मे. टन ऑक्सिजनची मागणी नोंदवा

दररोज एकशे पाच मे. टन ऑक्सिजनची मागणी नोंदवा

खा. हेमंत गोडसे यांचे अन्न, औषध प्रशासनाला निर्देश

दे.कॅम्प । वार्ताहर

जिल्ह्यात होणार्‍या आॉक्सिजनच्या अपुर्‍या पुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन दररोज 105 मॅट्रिक टन इतक्या आॉक्सिजनच्या कोट्यास मान्यता मिळावी यासाठीचे विशेष पत्र पाठविण्याचे निर्देश खा.हेमंत गोडसे यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिलेत.

गेल्या काही दिवसांपासून करोनाने जिल्ह्यात थैमान घातल्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. विविध कोव्हिड सेंटर असलेल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आज दिवसभरात खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे अनेक डॉक्टरांनी केल्या होत्या. रुग्णालयांना ऑक्सीजन पुरवठा होत नसल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांना इतरत्र पाठविण्याची वेळ अनेक हॉस्पिटल प्रशासनावर येत आहे.

याची गंभीर दखल घेऊन आज खासदार हेमंत गोडसे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय गाठले. उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांच्या सोबत गोडसे यांनी ऑक्सिजनच्या पुरवठा विषयीची सविस्तर माहिती घेतली. जिल्ह्यामध्ये एकूण नऊ ऑक्सिजन साठवणुकीचे केंद्र असून दोन केंद्रांकडून प्रत्यक्ष हवेतून ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. हवेतून ऑक्सिजनची निर्मिती होण्याचे प्रमाण अल्प असून शासनाकडून दररोज अवघा 85 मेट्रिक टन ऑक्सिजनचा कोटा मंजूर झालेला आहे. पैकी प्रत्यक्ष 75 मॅट्रीक टनच ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. आज मितीस जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये सुमारे पन्नास हजार रुग्ण उपचार घेत आहेत.

शासनाकडून पुरवला जाणारा 75 मॅट्रिक टन ऑक्सिजन खूपच कमी असल्याने जिल्ह्यात ऑान्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी दररोज 75 ऐवजी 105 मेट्रिक टन ऑक्सिजनच्या कोट्यास मंजुरी मिळावी या मागणीचे पत्र शासनाकडे तातडीने पाठविण्याचे निर्देश खा गोडसे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी गोडसे यांनी मंत्रालयस्थित अधिकार्‍यांशी मोबाईलवरून संपर्क साधत पत्र मिळताच वाढीव कोट्याला तातडीने मान्यता देण्याची आग्रही मागणी केली. बैठकीस राहूल देशमुख, ब्राम्हणकर आदी अधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com