पंजाबच्या तरुणाची भुसावळमध्ये गळा चिरुन हत्या

भुसावळच्या रेल्वे यार्डातील घटना ,सोबतच्या मित्रांनी खून केल्याचा संशय, चौघे मित्र फरार
पंजाबच्या तरुणाची भुसावळमध्ये गळा चिरुन हत्या

भुसावळ Bhusaval। प्रतिनिधी

येथिल रेल्वे यार्डात (railway yard) एका 19 वर्षिय तरुणाचा (youth) गळा चिरुन (cut throat) हत्या (murdered)केलेला मृतदेह (finding the dead body) आढळुन आल्याने रेल्वे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसात (Crime in Lohmarg Police) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहीती अशी की, खंडवा डाऊन मार्गावरील रेल्वे यार्डात मनमीतसिंग गुरुप्रितसिंग (वय 19, रा.अमृतसर पंजाब) या तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला. मयत हा आपल्या पाच मित्रांसह अमृतसरहुन निघाला होता. अमृतसर एक्सप्रेसच्या डी-2 या डब्यातुन प्रवास करीत असताना सह प्रवाश्यासोबत त्यांचा वाद झाला.

या सर्वांनी त्या प्रवाशास मारहाण केली. दरम्यान त्या प्रवाशाने सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधला असता भिती पोटी या पाचही प्रवाशांनी भुसावळ यार्डात गाडी सोडली. दरम्यान दुसर्‍या पहाटे प्रवाश्यांना मनप्रितचा मृतदेह आढळुन आला. मयताच्या खिशात पंजाब अ‍ॅन्ड सिंध बँकेचे क्रेडिट कार्ड आढळले.

त्यावरुन रेल्वे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवीली. मयताच्या भावाने फिर्याद दिली त्यात मयता सोबत अजुन चार मित्र होते, असे सांगितले. त्यानी हा खुन केला असावा या संशयावरुन खुनाचा गुन्हा नोंद असुन चौघे मित्र पसार झाले आहेत. भुसावळ लोहमार्ग पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद असुन पोलिस निरीक्षक विजय घेरडे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com