मोठी दुर्घटना! मुंबईत खासगी विमान कोसळले; प्लेनचे दोन तुकडे, Video आला समोर

मोठी दुर्घटना! मुंबईत खासगी विमान कोसळले; प्लेनचे दोन तुकडे, Video आला समोर

मुंबई | Mumbai

येथील मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली असून एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे हे विमान मुंबई विमानतळावर लॅण्डिंग करतांना कोसळल्याचे समजते असून या विमानात (plane) एकूण आठ प्रवाशी होते. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे...

मोठी दुर्घटना! मुंबईत खासगी विमान कोसळले; प्लेनचे दोन तुकडे, Video आला समोर
Nashik News : युवा शेतकऱ्याने साजरा केला हटके बैलपोळा; सर्जा-राजासह कापला केक

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टण ते मुंबईदरम्यान (Visakhapatnam to Mumbai) VSR एव्हिएशनची Learjet ४५ विमानाचे उड्डाण होते. परंतु, मुंबईत मुसळधार पाऊस (Rain) असल्याने लॅण्डिंग करताना हे विमान धावपट्टी २७ वरून घसरले. विमान घसरल्याने विमानाला आग देखील लागली. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, या अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. तसेच या विमानाने ६ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्ससह ८ जण प्रवास करत होते, अशी माहिती 'डीजीसीए'ने दिली आहे.

मोठी दुर्घटना! मुंबईत खासगी विमान कोसळले; प्लेनचे दोन तुकडे, Video आला समोर
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट; म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत आम्ही...

दरम्यान, या विमान दुर्घटनेमुळे मुंबईत येणारी आणि मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी जवळपास ५० विमाने प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे. तर अपघातानंतर विमानाला मोठी आग (Fire) लागली होती. या आगीवर एअरपोर्टवरील यंत्रणांनी तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मोठी दुर्घटना! मुंबईत खासगी विमान कोसळले; प्लेनचे दोन तुकडे, Video आला समोर
मोठी बातमी! तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगेंनी सोडलं उपोषण; मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com