चाळीसगाव-धुळे महामार्गावरील खड्ड्यानी घेतला चिमुकलीचा बळी

मोटारसायंकला टँकरचा अपघात, महामार्ग दुरुस्ती अभावी बनतोयंं मृत्यूचा मार्ग
चाळीसगाव-धुळे महामार्गावरील खड्ड्यानी घेतला चिमुकलीचा बळी

चाळीसगाव Chalisgaon | प्रतिनिधी

चाळीसगाव-धुळे महामार्ग (Chalisgaon-Dhule Highway) हा चौपदरीकरणाच्या नावाखाली, रस्त्यावरील खड्ड्यामुळे (pothole in the road) मृत्यूचा महामार्ग (pothole in the road) बनतो आहे. दि.१९ रोजी चाळीसगाव-धुळे (Chalisgaon-Dhule road) रस्त्यावर दहिवद फाट्याजवळ खड्डे चुकविण्याच्या (Avoid potholes) नादात मोटारसायकलला (motorcycle) मागुुन आलेल्या टँकरने जोरदार धडक (tanker hit hard) दिली. या अपघातात (accident) मोटारासायंकलवर आईच्या माडीवर बसलेली (Sitting on mother's lap) चार वर्षीय चिमुकली (little girl) खाली पडून टँकरच्या चाकाखाली (Under the wheel of a tanker) आल्याने तिचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला टँकर चालकाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील उंबरखेड येथील गोरख दिनकर पाटील यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी त्याचे जावाई तुषार त्र्यंबक भामरे, पत्नी हेमांगी तुषार भामरे व गीतांजली (वय ४) रा.पिप्राळ-नरडाणे ता.शिंदखेडा,जि.धुळे हे दि,१९ रोजी कुटुंबासह आले होते. अंत्यविधी आटोपल्यानतंर ते दि,२० रोजी घरी जाण्यासाठी आपल्या मोटारसायंकलने (क्र.एमएच,१८,एआर २७७८) चाळीसगाव-धुळे महामार्गावरुन जात असताना, मार्गावर पडलेले मोठ-मोठे खड्डे चुकविण्याच्या नांदात मागुन येणार्‍या भरधाव टँकरने (क्र.जीजे ०६, एव्ही ७३२९) मोटरसायंकला जोरात धडक दिली.

यात आईच्या माडीवर बसलेली चार वर्षीय गितांजली खाली पडली आणि टँकरच्या चाकाखाली आली. यात तिच्या डोक्यावरुन चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना आई-वडिलाच्या डोळ्या समोर घडल्याने त्यांनी एकच मन हेलावून टाकणार आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. बालिकेचा मृतदेह पाहून त्यांचे देखील डोळे पाणावले, पोलिसांनी तात्काळ बालिकेचा मृतदेह मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. अपघातग्रस्तांना कुठलीही मदत न करता टँकर चालकानेे घटना स्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गोरख दिनकर पाटील यांच्या फिर्यादीवरुन टँकर चालकाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव-धुळे महामार्ग मृत्यूचा महामार्ग-

चाळीसगाव-धुळे महामार्ग चौपदरीकरणाच्या नावाखाली ठेकेदाराने रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण रस्त्यांची वाट लागली आहे. चाळीसगाव ते मेहुणबारे दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यात रस्ता शोधावा लागत आहे. गेल्या काही दिवसापासून या मार्गावरील मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे ट्रक व अन्य वाहनांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

तर खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकाचे जीव गेले आहेत. आज पुन्हा खड्डे चुकविण्याच्या नादात मोटारसायंकल बसलेल्या आईच्या माडीवरुन पडलेल्या चिमुरडीचा जीव गेला आहे. त्यामुळे फक्त टँकर चालकावर गुन्हां दाखल करुन चालणार नाही, तर महामार्गाची देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधीत ठेकेदारावर सुद्धा गुन्हां दाखल करण्याची गरज आहे. तसेच त्वरित रस्त्याची डागडुजी व खड्डे बुजवावे अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com