Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याउच्चभ्रू वस्तीतील बंगल्यावर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

उच्चभ्रू वस्तीतील बंगल्यावर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

नाशिक | प्रतिनिधी

मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट कॉलनीमध्ये एका बंगल्यात देह व्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली होती.

- Advertisement -

त्यानुसार आज या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून तीन आरोपींना ताब्यात घेतले असून पाच महिलांची सुटका केली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहकले यांनी दिली.

याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात विविध कलमाने संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. मागील काही दिवसांपासून शहरात असे कृत्य जास्त सुरू झाले असून पोलीस सतत त्यांच्यावर कारवाई करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या