Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन

नागपूर | Nagpur

महाराष्ट्रात सध्या नेते आणि अभिनेते यांना धमक्या देण्याचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करण्यात आला होता. हा फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला बेळगावमध्ये अटक झाल्यानंतर त्याचा ताबा नागपूर पोलिसांना (Nagpur Police) नुकताच घेतला आहे.

- Advertisement -

तसेच बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Bollywood actor Salman Khan) यांसही काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती, या घटना ताज्या असतानाच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नागपूर येथील घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन आला आहे. त्यामुळे नेते आणि अभिनेत्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धमकी देण्याचे सत्र सध्या महाराष्ट्रात सुरु आहे असे दिसून येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री दोन वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले होते.

समृद्धी महामार्गावरून रात्रीचा ठरतोय प्रवास धोकादायक!

मात्र, खोडसाळपणाने हा फोन करण्यात आल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, फोन करणारा व्यक्ती हा नागपूरच्या कन्हान भागातील राहणारा आहे. घरची वीज गेली म्हणून रागाच्या भरात त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्यानंतर पोलिसांनी तातडीने फडणवीसांच्या घराकडे धाव घेत बॉम्ब शोधक पथक दाखल करत पोलीस सुरक्षा वाढवली. धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले; तसेच पुढील कारवाई केली जात आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्तांनी (Nagpur Police Commissioner) दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या