Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारमुंबई सेंट्रल ते दोंडाईचा दरम्यान नविन प्रवाशी रेल्वे धावणार

मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा दरम्यान नविन प्रवाशी रेल्वे धावणार

नंदुरबार । nandurbar प्रतिनिधी

भुसावळ बांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेसच्या (Bhusawal Bandra Terminus Khandesh Express) प्रचंड प्रतिसादामुळे तमाम खान्देशातील प्रवाशांची खान्देश एक्स्प्रेस दररोज करण्याची मागणी होती परंतु मध्य रेल्वेच्या जळगाव भुसावळ स्थानकांवर तांत्रिक अडचणींमुळे शक्य होत नव्हते यावर पश्चिम रेल्वे ने पर्याय काढत दोंडाईचा स्थांनकापावेतो नविन मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते दोंडाईचा (Dondaicha) 09051 व दोंडाईचा ते मुंबई सेंट्रल 09052 हि गाडी प्रायोगिक (passenger train) तत्त्वावर सुरू केली आहे.

- Advertisement -

पश्चिम खान्देशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.23 डिसेंबर पासुन 31 मार्च पावेतो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे.

सदर गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री 11.55 मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासादरम्यान दादर, बोरीवली, वापी, बलसाड, नवसारी, चलथान, भे, बारडोली, व्यारा, नवापुर, नंदुरबार या ठिकाणी थांबुन सकाळी 8.05 मिनीटांनी दोंडाईचा येथे पोहोचेल.

दोडांईचाहुन सोमवार बुधवार व शनीवारी रात्री 10.15 मिंनीटांनी सुटेल तर मुंबई सेंट्रल येथे सकाळी 6 वा.पोहचेल.

सदर गाडी दोंडाईचा रेल्वे स्थानकांवर दिवसभरात एक फेरी उधनासाठी धावणार असुन सकाळी 11.30 वा.दोडांईचाहुन उधनासाठी सुटेल व उधना येथे दुपारी 2.30वा.पोहचेल उधना येथुन 4.30 वा दोंडाईचासाठी निघेल व दोंडाईचा येथे सायंकाळी 7.30 वा.पोहचेल.दरम्यान उधणा ते पुणे रेल्वे सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या