कुपोषण निर्मुलनासाठी नव्या प्रयोगास सुरुवात

कुपोषण निर्मुलनासाठी नव्या प्रयोगास सुरुवात

नाशिक । नरेंद्र जोशी | Nashik

कुपोषण निर्मुलनासाठी (Elimination of malnutrition) दरवर्षी महिला व बालविकास विभाग (Department of Women and Child Development) कोट्यवधी रुपये खर्च करतो.

पण कुपोषण (Malnutrition) निर्मुलनाची आकडेवारी जैसे थे राहते. म्हणूनच आता जिल्हा परिषदने (zilha parishad) स्तनपान पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी अडीच हजार आरोग्य सेविकांमधून (Health care workers) अडीचशे सेविकांना निवडून कुपोषण निर्मितीचा नवा अध्याय रचण्यास सुरुवात केली आहे.

आयआयटी-मुंबई (IIT Mumbai) यांच्या सितारा संस्थेच्या मदतीने अशा उपक्रमातून नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) स्तनपान पद्धत बदलण्याच्या मार्गातून कुपोषण कमी केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल (Chief Executive Officer Ashima Mittal) यांंना आढळून आल्याने आता तोच कित्ता नाशिकला गिरवला जात आहे. नाशिक जिल्ह्यात (nashik district) अडीच हजार आरोग्य सेविकांंची नुकतीच परीक्षा घेण्यात आली. त्यातून अडीचशे सेविकांंची निवड केली जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी आहे. तेथे दुर्गम भाग, खरीप हंगामाव्यतिरिक्त शेती व रोजगार नसल्याने रोजगारासाठी होणारे स्थलांतर आणि शिक्षणाचा अभावांमुळे कमी वजनाची, कुपोषित बालकांचे प्रमाण मोठे असते. यामुळे बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जातात. त्यात गरोदर माता, स्तनदा माता व शून्य ते सहा वर्षांच्या बालकांसाठी विविध योजना राबवूनही कुपोषणाची परिस्थिती थोड्याफार फरकाने तशीच राहते.

यापूर्वी जिल्हा परिषदेत (zilha parishad) दोन वर्षे मूठभर पोषण ही योजना ग्रामपंयाचीतीमार्फत राबवली. या योजनेच्या अंमलबजावणीनंतरही जिल्ह्यातील कमी वजनाच्या बालकांच्या संख्येत फारसा फरक पडला नाही. म्हणूनच अशिमा मित्तल यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर कुपोषण निर्मुलनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले.आयआयटी-मुंबईच्या अंतर्गत असलेल्या सितारा य संस्थेकडून सामाजिक-आर्थिक समस्यांवर काम केले जात आहे.

यामुळे मित्तल यांनी सितारा संस्थेशी संपर्क साधून जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाच्या कर्मचारी, अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी यांना याबाबत प्रशिक्षण दिले. अडीच हजार जणांची परीक्षा घेतली. त्यातून अडीचशे जण निवडले जाणार आहे.

कुपोषणाची आकडेवारी

  • 3 लाख 37 हजार 457 बालकांंचे सर्वेेक्षण.

  • 3 लाख 23 हजार 724 बालकांचे वजन घेतले.

  • सर्वसाधारण बालके 2 लाख 92 हजार 836.

  • मध्यम कमी वजनाची बालके 24हजार 587

  • तीव्र कमी वजनाची बालके 6301

  • मध्यम गंभीर कुपोषित बालके 1898

  • तीव्र गंभीर कुपोषित बालके 210

बाळ जन्माल्यानंतर आई स्तनपान करते. हे अनादी काळापासून गृहित धरले जाते. पण चुकीच्या पद्धतीने होणारे स्तनपान बाळाच्या वाढीवर परिणाम करते. यामुळे त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. याशिवाय गरोदर माता, स्तनदा माता यांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करून त्यांना योग्य तो पोषण आहार दिला जाणार आहे. यामुळे बालकांना मातेचे पुरेसे दूध मिळू शकेल. यासाठी गरोदरपणाासून पुढील तीन वर्षे माता व बालक यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून बाह्य आहारापेक्षा स्तनपानावर भर दिला जाणार आहे. त्या कामाची सुरुवात झाली आहे. अडीचशे प्रशिक्षीत कर्मचारी नियुक्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही होईल.

- दीपक चांटे, महिला व बालविकास अधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com