हलव्यांच्या दागिण्यांचा विदेश प्रवास .... काय आहे प्रकरण वाचलेच पाहिजे....

हलव्यांच्या दागिण्यांचा विदेश प्रवास .... काय आहे प्रकरण वाचलेच पाहिजे....

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

मकर संक्रात म्हटली की सर्वांना आठवतो तो हलवा आणि हलव्याचे दागिने (halva jewelery). हलवा तयार करणे काही प्रमाणात सोपे वाटत असले तरी त्याचे दागिणे तयार करणे वाटते तेवढे सोपे नाही. आणि असे दागिने थेट परदेशात (foreign country) पाठवणे म्हणजे काही औरच. आणि तेही सत्तर वर्षापासून.. काय आहे ते वाचलेच पाहीजे...

तारखेनुसार मकर संक्रांत येताच चार पाच दिवसांपासून मकर संक्रांतीचा माहोल तयार होत असतो. परंतू जळगावच्या डोहोळे परिवारात मात्र संक्रांतीची चाहूल दोन महिन्यांपुर्वीच लागते. हलव्याचे दागिने तयार करण्यासाठीच्या सर्व साहित्याची खरेदी करून हलवा तयार करून त्याचे दागिने तयार केले जातात.

मकर संक्रांतीनिमीत्त येथील डोहोळे परिवारात गेल्या 70 वर्षांपासून स्व. उमा उपेंद्र डोहोळे यांच्यापासून त्यांची नातसून अनघा अजय डोहोळे या तिसर्‍या पिढीपर्यंत हाताने हलव्याचे दागिने तयार करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

यंदा मुलुंड येथील सुनिता सतीश बिडवई यांनी आयर्लंड मध्ये वास्तव्यास असलेल्या नवविवाहित आदिती अंकुर त्रिपाठी हिच्या संक्रांती सणासाठी अनघा डोहोळे यांनी तयार केलेले हलव्याचे दागिने तिकडे पाठवले आहे.

सुनीता बिडवई यांचे आजोळ जळगावचे आहे. त्यामुळे त्यांना हलव्याच्या दागिन्यांबाबत माहिती आणि आवड आहे. नवविवाहीत आदिती हिच्या पहिल्या संक्रातसणासाठी त्यांनी डोहोळे परिवाराशी संपर्क साधून दागिन्याची ऑर्डर दिली.

उमा डोहोळे यांनी स्वतः हाताने 50 किलो पर्यंतचा हलवा बनवून त्याचे दागिने तयार करून सुनिता सतीश बिडवई यांना पाठविले. त्यांनी ते दागिने आयर्लंडला पाठविले. उमाताईं हलवा तयार करून महिला सहकारी मंडळास विकत देत असतात. त्यांची मुलगी स्व.शालिनी पानट व नात मीनाक्षी कुलकर्णी या दोघी हलव्याचे दागिने तयार करीत असतात.

तिसर्‍या पिढीकडून परंपरा सुरुच

सोशल मीडियाच्या माध्यमातून डोहोळे परिवाराची तिसरी पिढी देखील ही परंपरा पुढे चालवीत असल्याची त्यांना माहिती मिळाली. बिडवई यांनी अनघा यांच्याशी संपर्क साधून विदेशात असलेल्या आपल्या मुलीसाठी मंगळसूत्र, राणीहार, तनमणी, बांगड्या, तोडे, ठुशी, कंबरपट्टा, बाजूबंद, नथ, झुबे, बिंदी आणि जावईंसाठी हलव्याचे दागिने मागणीप्रमाणे तयार करून घेतले. त्यांचा मुलगा आदित्य बिडवई यांच्या मदतीने काळजी घेत मायेच्या ममतेने पॅकिंग करीत कुरिअरद्वारे आयर्लंड येथे हे जळगावतील हलव्याचे दागिने पाठविण्यात आले आहे.

कलेची आवड असल्यामुळे सासरी आल्यानंतर हलव्याचे दागिने तयार करण्याचे मी स्वतः शिकून घेतले. गेल्या पाच वर्षांपासून मी ही परंपरा पुढे चालवीत आहे. आज मी तयार केलेले हलव्याचे दागिने विदेशात गेल्यामुळे माझ्या आजेसासूं पासूनचा परिश्रमाचा वारसा समृद्ध झाला आहे. त्याचा मला खूप आनंद होतो आहे.

अनघा अजय डोहोळे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com