Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअंग झडतीत कैद्याकडे सापडला मोबाईल

अंग झडतीत कैद्याकडे सापडला मोबाईल

नाशिकरोड |प्रतिनिधी Nashikroad

येथील मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याकड अंग झडतीत मोबाईल फोन सापडल्याची घटना घडली असून याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

कारागृह शपाई देविदास शेषराव जगदाळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे पाच वाजेच्या दरम्यान ते आणि त्यांचे सहकारी विभक्त कोठडी क्र 1 मधील रूम न 63 मध्ये असलेले कैदी आदील अबिध शेख , समिर निजाम पठाण उर्फ चींग्या यांच्या रुमची झडती घेतली असता काहीही आढळून आले नाही मात्र झडती घेत असताना आदिल हा घाबरलेल्या अवस्थेत दिसून आल्याने झडती पथकाला संशय आला.

त्यांनी आदिल याची अंग झडती घेतली असता काही मिळाले नाही मात्र मेटल डिटेक्टर वाजत असल्याने आम्ही त्यास स्वच्छता गृहात नेले त्यास शौचास बसवले असता त्याच्या गुद्दरतून एक प्लास्टिक पिशवी बाहेर आली त्यामध्ये एका काळ्या रंगाचा मोबाईल फोन मिळून आला असून तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या