'या' दिवशी होणार जिल्हा उद्योग मित्राची बैठक

'या' दिवशी होणार जिल्हा उद्योग मित्राची बैठक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील तीन वर्षांपासून रखडलेली जिल्हा उद्योग मित्र (District Industry Friend) बैठक अखेर 6 डिसेंबरला घेण्याचे निश्चित करण्यात आले असून

या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न सुटण्यासाठी एक नवा व्यासपीठ पुन्हा कार्यान्वित होत असल्याने उद्योजक (entrepreneur) समाधान व्यक्त करीत आहे. राज्य शासनाने (state government) उद्योगांची प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा उद्योग मित्र या बैठकीचे नियोजन केले होते.

दर महिन्याला ही बैठक उद्योजकांच्या प्रश्नांसाठी घेण्याचे निश्चित करण्यात आले असून जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेतली जाते या बैठकीला शासनाच्या विविध खात्यांचे निर्णय अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

उद्योगाच्या प्रश्नांची वाचल्या त्या जागेवरच लागू शकते हा त्यावर मागचा उद्देश ठेवण्यात आला होता मात्र 2019 नंतर या बैठकीला मुहूर्तच लागला नाही मागील महिन्यात बैठक निश्चित करण्यात आली होती मात्र जिल्हाधिकार्‍यांना अचानक सुट्टीवर जावे लागल्याने 23 नोव्हेंबर चा मुहूर्त ही कळला होता आता सहा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत मागील प्रलंबित अनेक प्रश्न आजही असेच लोंबकळत असले तरी त्यानंतर निर्माण झालेले विविध समस्या ही तितक्याच भेडसावत आहेत त्यात प्रामुख्याने भूखंडाची उपलब्धता नसणे, रस्ते (road), वीज (electricity), पाणी (water) समस्या आहेत. मनपाच्या घरपट्टीवर (water tax) 40 पट वाढ झाली आहे. ती सुरळीत करणे, मनपा व एमआयडीसी (MIDC) हे दोघांकडून फायर सेस वसूल केला जातो.

हा डबल टॅक्स (double tax) रद्द करावा या सोबतच उद्योग क्षेत्रातील वाहनतळ, मोकळ्या भूखंडावरील वृक्षारोपण ऐवजी वाढलेली घाण आदींचे विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यावरही या बैठकीत भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com