Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्र सरकारचा मोठा निर्णय; 348 मोबाईल अ‍ॅपवर बंदी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 348 मोबाईल अ‍ॅपवर बंदी

नवी दिल्ली । New Delhi

नागरिकांची माहिती गोळा करणे, त्यांची प्रोफायलिंग करणे आणि अवैध मार्गाने ती बाहेरच्या देशातील संस्थांना पुरवणार्‍या 348 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स केंद्र ( Mobile Apps )सरकारने ब्लॉक केले आहेत.

- Advertisement -

यामध्ये चीन आणि इतर देशांच्या अ‍ॅपचाही समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Union Minister of State for Information and Technology Rajeev Chandrasekhar)यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे.

या अ‍ॅप्सवर बंदी घालावी अशी विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती. या विनंतीची दखल घेत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या