नदी ओलांडण्यासाठी जीवघेणा प्रवास

नदी ओलांडण्यासाठी जीवघेणा प्रवास

येवला । प्रतिनिधी Yevla

गेल्या तीन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस Heavy Rain झाला असून त्या पावसामुळे येवला तालुक्यातील मातुलठाण Matulthan येथील कातुरे वस्ती जवळील नारंदी नदीला Narandi River पूर आल्याने येथील नागरिकांना ये- जा करण्याकरिता अक्षरशः दोरीचा सहारा घेऊन नदी पार करण्याची वेळ आली आहे.

मातुलठाण येथील ग्रामस्थांचे हाल होत असून दोरीच्या सहाय्याने नदी पार करावी लागत आहे. या ठिकाणी पुल बांधण्याची मागणी Demand to build a bridge नागरिक करत असून या नदी लगत जवळपास 25 कुटुंब राहत असून नदीला पूर आल्यावर येण्याजाण्याचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकाना अक्षरशः दोरीचा आधार घेत नदीच्या पाण्यातून जीवघेणी कसरत करून ये - जा करावी लागते.

तरी संबंधित विभागाला पूल बांधून द्यावे ही मागणी करून देखील संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने त्वरित पूल बांधून द्यावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.

Related Stories

No stories found.