Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याVIDEO: 'देशदूत' नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोला शानदार सुरुवात

VIDEO: ‘देशदूत’ नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पोला शानदार सुरुवात

नाशिक । | प्रतिनिधी | Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’ (deshdoot) आयोजित

- Advertisement -

तसेच ललित रुंगटा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (Lalit Rungata Builders & Developers) प्रायोजित ‘नवीन नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२३’ (New Nashik Property Expo 2023) प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, ललित रुंगटा ग्रुपचे संचालक अभिषेक बुवा, मालपाणी गृहनिर्माण प्रा.लि.चे संचालक राहुल मालपाणी यांच्या हस्ते प्रॉपर्टी एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी ‘देशदूत’चे मार्केटिंग महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. रविवार (दि.५) पर्यंत तीन दिवसांत प्रदर्शनाचे आयोजन उत्तम नगर, अंबड लिंक रोड येथील भोळे मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.

दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व नागरिकांना येथे खुला प्रवेश आहे. घर असो वा दुकान सर्व गृह तसेच व्यावसायिक प्रकल्पांची माहिती नागरिकांना एकाच छताखाली येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनात नाशिक (nashik) शहरातील त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे २६ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यात दक्ष रिअल्टी, राजश्री प्रॉपर्टीज्, भाविक ग्रुप, मालपाणी गृह निर्माण प्रा. लि., अर्चित ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, अवध ग्रुप, व्ही क्यूब रिअल्टी, रवींद्र डेव्हलपर्स प्रा. लि. अक्षर अनंत, हरी ओम ग्रुप, द्वारकामाई बिल्डकॉन, ग्रोवर्थ इन्फ्रा आदी नामांकित ग्रुप सहभागी झाले आहेत.

मान्यवरांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. प्रदर्शनाचे प्रायोजकत्व नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ललित रुंगटा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (Lalit Rungata Builders & Developers) यांनी स्वीकारले आहे. तीन दिवसात दररोज लकी ड्रॉ (Lucky draw) काढण्यात येणार आहे.

भाग्यवान विजेत्यास साई संस्कृती पैठणीतर्फे (Sai Sanskruti Paithani) रोज सेमी पैठणी (Semi Paithani) व मलाबार गोल्ड अँड डायमंडस् (Malabar Gold and Diamonds) तर्फे चांदीचे नाणे मिळणार आहेत. साई संस्कृती पैठणी व मलबार गोल्ड अँड डायमंडस् हे गिफ्ट पार्टनर (Gift partner) आहेत पर्यावरणीय पार्टनर पपायाज् नर्सरी (Environmental Partner Papaya’s Nursery) आणि स्पायडर मीडिया हाऊस इव्हेंट पार्टनर (Event Partner Spider Media House) आहेत.

गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी दै देशदूतचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, कॉर्पोरेट व्यवस्थापक संदीप राऊत, वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक, पत्रकार निशिकांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, आनंद कदम, समीर पाराशरे, रितेश जाधव, यांनी परिश्रम घेतले. जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी आभार मानले.

मुंबई, पुणे नंतर नाशिक या महत्वाच्या शहराची झपाट्याने वाढ होत आहे. सवलतीच्या दरात घर, दुकाने उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांना याचा अजून जास्त फायदा होईल. स्वतःचे घर असावे हे सर्वांचे स्वप्न असते. हे साकार करण्यासाठी देशदूत ने आयोजित केलेल्या एक्स्पोमुळे मदत होणार आहे.

-सुधाकर बडगुजर

ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये योग्य समन्वय साधला जाणार आहे. ग्राहकांना येथे एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध आहेत. देशदूत ने आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यायला हवा.

-अभिषेक बुवा

अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून नवीन नाशिक आणि परिसरातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. नवीन नाशिक परिसरात नाशिकच्या विकासकांनी विकसित केलेले प्रकल्प नाशिककरांनी आवर्जून बघायला यावे. देशदूतच्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.

– राहुल मालपाणी

- Advertisment -

ताज्या बातम्या