बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

तालुक्यातील ब्राम्हणवाडे शिवारात (Brhamnwade Area) आज संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) चार वर्षीय बालिकेचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राम्हणवाडे येथील नवसू पांडू कोरडे यांची चार वर्षांची मुलगी (Girl) नयना नवसू कोरडे ही बालिका संध्याकाळच्या सुमारास घरासमोर खेळत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला व दूरवर फरपटत नेले. यात सदर बालिकेचा मृत्यू झाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दरम्यान, यानंतर तात्काळ घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सदर बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com