Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याचोरट्यांचा धुमाकूळ; सात दुकानांचे शटर तोडून ऐवज लंपास

चोरट्यांचा धुमाकूळ; सात दुकानांचे शटर तोडून ऐवज लंपास

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

लासलगाव( Lasalgaon) येथे दोन चोरट्यांनी तब्बल सात तास धुमाकूळ घालुन यातील दोन चोरट्यांनी अगोदर मोटारसायकल चोरी केल्यानंतर सात दुकानांचे शटर तोडून हजारो रुपयांचा ऐवज चोेरून नेल्याची घटना घडली आहे. यातील दोन दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये सदरचे चोरटे कैद झाले आहे.

- Advertisement -

या घटनेने परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पहाटेच्या वेळेस स्थानिक नागरिक कोटमगाव रोड व रेल्वे स्टेशन रोडवर फिरण्यासाठी जात असताना दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती प्रकाश छाजेड आणि संजय धाडीवाल यांना सदरच्या नागरिकांनी दिल्याने त्यांनी तातडीने दुकानात येवून पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान सीसीटीव्ही तपासले असता त्यात दोन चोर चोरी करताना स्पष्ट दिसून आले. लासलगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. सीसीटीव्ही वरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

लासलगाव शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे या घटनेवरून लक्षात येते. शहरात एकाच रात्री सात ठिकाणी दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनिता गिफ्ट, निलेश ट्रेडर्स, रालको टायर्स, सद्गुरू ट्रेडर्स, सिद्धार्थ जनरल स्टोअर्स, सुमित ट्रेडर्स ही दुकाने चोरट्यांनी फोडून यातील 40 तेे 45 हजारांचा माल चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे.

यातील तीन दुकाने ही कोटमगाव रोडवरील तर ग्रामपंचायत जवळील दोन दुकाने आणि स्टेशन रोडवरील खैरे कॉम्प्लेक्स मधील दुकानांचा समावेश आहे. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील गोडावूनचा समावेशही यात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

यावेळी लासलगाव दौर्‍यावर आलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरपंच जयदत्त होळकर, माजी उपसरपंच संतोष ब्रम्हेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन शिंदे यांच्या समवेत चोरांनी फोडलेल्या दुकानांची पहाणी करून स.पो.नि. राहूल वाघ यांना सदरच्या घटना रोखण्याबाबत योग्य त्या सूचना केल्या. यावेळी भुजबळ यांनी नामकोचे संचालक प्रकाश दायमा यांचे बंधू मोहनलाल दायमा यांचे निधन झाल्याने त्यांचे निवासस्थानी जावून दायमा कुटुंबाचे सांत्वन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या