वीज पडून शेतमजुराचा मृत्यू

 वीज पडून शेतमजुराचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे अंगावर विज पडून कचरू देवराम बोंबले ( वय४५) यांचा जागीच मृत्यू झाला. धाऊर पोफळवाडे परिसरात आपल्या पत्नी समवेत शेतमजुरी साठी गेलेले कचरू देवराम बोंबले हे कामावरून परत येत असताना रस्त्यात जोरदार पाऊस सुरू झाला. पावसा सोबतच विजांचा कडकडाट होऊ लागला.

यावेळी पती पत्नी शेतातून बाहेर येतांना कचरू बोंबले यांच्या अंगावर विज पडल्याने ते कोसळले व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पत्नी काही अंतर मागे असल्याने यापासून बचावली. पोलिस पाटील मनिषा पताडे यांनी सदर घटनेची माहिती पोलिस व महसुल विभागास दिली. त्यानुसार दिंडोरी पोलिस ठाण्यात पी आय वाघ यांनी घटना स्थळी भेट दिली. तर पी एस आय किरण पाटील यांनी पोलिस नाईक धनंजय शिलावटे यांचे समवेत घटनेचा पंचनामा करत अधिक तपास करत आहेत.

पंचनामा करतांना धाऊर गावाचे उपसरपंच भास्कर पताडे, पिंटू पताडे ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोंबले, काळु बोंबले व वाळु बोंबले आदि उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com