Thursday, April 25, 2024
HomeजळगावLatest Breaking news # महामार्गावर आयशर ट्रकने धरणगावच्या वकिलाला चिरडले

Latest Breaking news # महामार्गावर आयशर ट्रकने धरणगावच्या वकिलाला चिरडले

जळगाव- jalgaon

शहरातील मानराज पार्क येथे भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने (Eicher truck) जोरदार धडक देऊन चिरडल्याची (crushed) घटना गुरुवारी २३ मार्च रोजी सायंकाळी घडली आहे, दरम्यान अपघात (accident) घडल्यानंतर नागरिकांनी पाठलाग करून ट्रक पकडला. परंतु आयशर ट्रक चालक हा ट्रक सोडून पसार झाला आहे. ॲड. (lawyer) विवेक प्रकाश पाटील (वय-३५, रा. धरणगाव) असे ठार झालेल्या वकिलाचे नाव आहे.

- Advertisement -

धरणगाव येथील रहिवासी ॲड. विवेक प्रकाश पाटिल (वय-३५) जिल्‍हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. जळगाव ते धरणगाव दुचाकी (एमएच १९ सीएच १३९६) ने अपडाऊन करुन त्याचे कामकाज सुरु असते. गुरुवारी २३ मार्च रोजी नेहमी प्रमाणे विवेक पाटील हे जळगावी आले होते. कामाच्या व्यापामुळे उशिर होवुन रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते, त्यांच्या दुचाकीने घराकडे (धरणगाव) येथे निघाले.

जळगाव शहरातील मानराज पार्क जवळून दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रक (एमएच ०४ एचएस २०१४ ) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर पडल्यानंतर चिरडले गेले. 

अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव शहरात राहणारे मित्रपरिवार व वकील सहकारी यांनी एकच गर्दी केली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मयत विवेकच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. मयत ॲड.विवेक पाटिल यांच्या पश्चात सहा महिन्याची मुलगी, पत्नी आणि आई असा परिवार आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठली ही नोंद करण्यात आलेली नव्हती.

- Advertisment -

ताज्या बातम्या