Monday, April 29, 2024
HomeनाशिकNashik Crime News : सराईत गुन्हेगाराला बेदम मारहाण; पेटवून देत केली हत्या

Nashik Crime News : सराईत गुन्हेगाराला बेदम मारहाण; पेटवून देत केली हत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीतील सराईत गुंड आणि खासगी सावकारी करणाऱ्या संदेश काजळे याची त्याच्याच मित्रांनी जाळून (Burning) टाकत हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना माेखाडा पाेलिसांच्या (Mokhada Police) हद्दीत घडली असून ताे मद्याच्या नशेत असताना मारेकरी मित्रांनी त्याला निमाणी बस्स्थानकासमाेर मारहाण (Beating) करुन इकाे गाडीतून अपहरण करत माेखाडा येथे नेऊन हत्या केली. यानंतर मृतदेह अर्धवट जाळून पुरावा नष्ट केल्याचे समाेर आले आहे. तर, गुन्हेशाखा युनिट एकने या प्रकरणात मुख्य सूत्रधार स्वप्निल उन्हवणे याला गुन्ह्यात वापरलेल्या इकाे कारसह चाेवीस तासांत अटक (Arrested) केली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, संदेश चंद्रकांत काजळे(वय ३५ रा. माताजी चौक, विजयनगर, सिडको) असे मृत गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी खंडणी, अवैध सावकारी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, दमदाटी, अँट्रोसिटीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल होते. ९ फेब्रुवारी रोजी रात्री संदेश काजळे हा पंचवटीतील निमाणी बसस्थानकासमोरील सूर्या या हॉस्पिटलच्या मागील पार्किंमध्ये आला असता त्याचे संशयित मित्र नितीन उर्फ पप्पू चौगुले(रा. ड्रीम कॅस्टल मागे, मखमलाबाद रोड), रणजित आहेर व स्वप्निल दिनेश उन्हवणे (वय २३, दोघे रा. राजवाडा, पंचवटी), पवन भालेराव(रा. त्र्यंबकेश्वर, राजवाडा) आणि इतरांत आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाले. यानंतर काजळेस मारहाण करुन त्याला कारमध्ये ढकलून अपहरण केले. यासंदर्भाने प्रितेश काजळे याने पाच जणांविरुद्ध पंचवटी पोलिसांत चुलतभावाचे अपहरण केल्याची तक्रार दिली.

यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच, रविवारी(दि.११) रोजी पहाटे मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताकपाडा परिसरातील निर्जन जंगलात काजळे याचा अर्धवट जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांना आढळून आला. काजळे याच्या अपहरणाच्या दाखल गुन्ह्याची माहिती व त्याचे वर्णन हुबेहुब काजळे याच्याशी जुळत असल्याने मोखाडा पोलिसांनी शहर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी आणि गुन्हेशाखा युनिट एकने समांतर तपास केला. तेव्हा युनिट एकला संशयित उन्हवणे हा इको कारसह त्र्यंबक भागात असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सूचनेने पथकाने सापळा रचून उन्हवणे यास अटक केली. तर उर्वरित चार जणांचा शोध सुरु आहे. या अपहरणसंदर्भाने मृत काजळे याचा चुलत भाऊ प्रितेश काजळे याच्या फिर्यादीनुसार पाच जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तर, खुनाचा प्रकार उघड झाल्याने याच अपहरणाच्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहेत.

असा होता काजळे

मृत संदेश याने जानेवारी २०२० मध्ये वाढदिवसानिमित्त रविवार कारंजा येथील निखिल पवार याच्या दरी-मातोरी येथील बाणगंगा फार्म हाऊसवर सेलिब्रेशन पार्टी ठेवली होती. तेथे ओझर येथील दोघे डीजे ऑपरेटर डीजेवर गाणे वाजवित असतांना रात्री दहानंतर डीजे वाजविण्यास दोघांनी बंदी असल्याचे सांगून नकार दिला होता. त्याचाच राग आल्याने संदेश काजळे, त्याचा चुलतभाऊ संशयित प्रितेश काजळे यांसह संदेश वाघ, अभिषेक शिरसाट, रोहित डोळस, संदीप भवाळकर, प्रकाश वाघ, ओंकार मथुरे, भूषण सुर्वे, रवींद्र सूर्यवंशी यांनी संगनमताने डीजे ऑपरेटर तरुणांना बांधून ठेवत शॉक दिला होता. तर, हवेत गोळीबार करून या युवकांना मारहाण करुन त्यांचे कपडे काढत त्यांच्या अंगावर थंड पाणी ओतले होते. तसेच गुप्तांगावर सिगारेटचे चटके व बॅटरी संचांनी विजेचा शॉक दिला होता. यानंतर संदेश काजळे व इतरांना अटक होऊन सध्या ते जामीनावर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या