ग्रामपंचायत सदस्यावर फौजदारीची टांगती तलवार

पाहा 'कोणती' ग्रामपंचायत आणि कोण 'सदस्य'
ग्रामपंचायत सदस्यावर फौजदारीची टांगती तलवार
Breaking News

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

निफाड तालुक्यातील (Niphad taluka) कोठुरे ग्रामपंचायत सदस्य सुयोग गिते (Kothure Gram Panchayat member Suyog Gite) यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. गिते यांचे सदस्यत्व रद्द होऊन शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे...

कोठुरे ग्रामपंचायत सदस्य सुयोग माधव गिते यांनी सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे लक्षात आले.

तक्रारदार वर्षा राजेंद्र डोखळे (Varsha Rajendra Dokhale) यांनी जिल्हा जात पडताळणी समिती नाशिक येथे सादर केलेले लेखी पुरावे व सुनावणी दरम्यान केलेला युक्तीवाद पोलीस दक्षता पथकाचा चौकशी अहवाल व पुराव्याचे विश्लेषन यांचा जिल्हा जात पडताळणी समितीने एकमताने विचार केला.

सदस्य गिते यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्यार असल्याचे समजते आहे. या निकालाने गीते यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यत्व गमावण्याची नामुष्की आली आहे.

गिते यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी जातीचा दाखला दिनांक 22/12/2020 रोजी क्र.41551436140 ने मिळवला. कोठूरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र.3 मधून इतर मागास प्रवर्ग या राखीव जागेवर उमेदवारी अर्ज भरुन ते निवडून आले.

हा कुणबी जातीचा दाखला काढण्यासाठी दिलेल्या पुराव्यामध्ये आबा खंडू यांची जन्माची नोंद मेंढी ता. सिन्नर येथील दिलेली आहे. या नोंदीत आडनावाचा उल्लेख नाही. फक्त नामसाध्यर्म्य आढळल्याने ती व्यक्ती माझे पंजोबा आहे, असे खोटे प्रतिज्ञापत्र केले.

आबा खंडु यांची वारस नोंद शोधली असता आबा खंडू गिते ही व्यक्ती दि.14/04/1944 रोजी मयत झाली आहे व त्या व्यक्तीस वारस मुलगा नसून दोन बायका असल्याचा व त्यांचे नावे वारसदार म्हणून नोंद दाखल केली असा स्पष्ट उल्लेख आहे.

त्या व्यक्तीस कोणीही मुलगा किंवा मुलगी वारस नसल्याने त्यांच्या दोन पत्नीची वारस म्हणून नोंद झालेली आहे. त्या व्यक्तीस मुलगा नसल्याने ती व्यक्ती सुयोग माधवराव गिते यांचे पंजोबा नाही. फक्त सारखे नाव असल्याने ही नोंद सिन्नर तहसील कार्यालयातून काढून कुणबी जातीचा दाखला मिळवला आहे.

खोटे कागदपत्रे जोडून त्यांच्या घरातील भावाच्या मुलांचे कुणबी जातीचे दाखले क्र.1209723 दि.26/09/2018 रोजी मिळवले व त्याची पडताळणी दि.03/01/2019 ने नाशिक समिती यांच्याकडून 1953228 ने मिळविली आहे.

दाखले मिळवताना एकही महसूली पुरावा जोडलेला नाही. आबा खंडू ही वेगळी व्यक्ती असून त्यांचा व सुयोग माधव गिते यांचा कोणताही संबंध नाही. खोटे कागद बनवून व सारखे नाव असल्याने त्या कागदपत्रांच्या आधारे गितेंनी शासनाची दिशाभूल केल्याचे आढळले आहे.

गिते यांनी इतर मागास प्रवर्गातील कुणबी-83 या जातीचा दावा सिध्द करण्याची जबाबदारी पार पाडली नाही व जात दावा पुराव्यानिशी सिध्द केला नसल्याने उपविभागीय अधिकारी, निफाड ता. निफाड जि. नाशिक यांनी निर्गमित केलेले कुणबी-83 जातीचे प्रमाणपत्र क्र.41551436140 दिनांक 22/12/2020 अवैध ठरवून रद्द करण्यात आले आहे.

यामुळे गिते यांच्यावर फौजदारी कारवाईची टांगती तलवार तसेच ग्रामपंचायत सदस्यत्व गमावण्याची नामुष्की आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com