Sunday, April 28, 2024
Homeजळगावभरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला उडविले

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला उडविले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पत्नीला ड्युटीवर सोडण्यासाठी जात असलेल्या दाम्पत्याच्या (Couple’s bike) दुचाकीला मागून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने (truck) जोरदार धडक ()hit hard दिली. ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बांभोरी येथील जैन कंपनीसमोर घडली. या अपघातात हेमंत काशिनाथ चौधरी (वय-50) रा. खोटे नगर यांचा (husband death) मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर (Wife seriously injured) जखमी झाल्या आहे. जखमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. धडक देताच ट्रक चालक त्याठिकाणाहून पसार झाला.

- Advertisement -

शहरातील खोटे नगर परिसरात हेमंत चौधरी हे पत्नी माधवी हेमंत चौधरी (वय-45) यांच्यासह वास्तव्याला आहे. हेमंत चौधरी हे शहरातील पोलनपेठ परिसरात मेडीकल डिस्ट्रीब्यूटर येथे नोकरीला होते. तर त्यांची पत्नी माधवी बांभोरीयेथील एका कंपनीत नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हेमंत चौधरी हे पत्नीला ड्युटीवर सोडण्यासाठी हेमंत चौधरी हे दुचाकीने खोटेनगराकडून कंपनीकडे दुचाकीने निघाले. महामार्गावरुन जात असतांना बांभोरी गावाजवळ मागून भरधाव वेगाने पाळधीकडे जाणार्‍या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

रस्त्यावर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार असलेले चौधरी दाम्पत्य हे दुचाकीसह रस्त्याच्या खाली फेकले गेले. या अपघातात हेमंत चौधरी यांच्या डोक्याला तर त्यांच्या पत्नीला चेहर्‍याला व पायाला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरील स्थानिक ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपारार्थ दाखल करण्यात आले.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

अपघाताची माहिती मिळताच चौधरी यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उपचार सुरु असतांना हेमंत चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे कळता मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत

जखमी चौधरी दाम्पत्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केलेे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांची अडीच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या