Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याप्रभाग क्रमांक 28: व्हिजन असणारा नगरसेवक हवा

प्रभाग क्रमांक 28: व्हिजन असणारा नगरसेवक हवा

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

महानगरपालिका (Municipal Corporation) हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा (Wide roads) अभाव, पार्किंगच्या (parking) जागांचा अभाव, खेळाची मैदाने (graund), सार्वजनिक स्वच्छतागृह (Public toilets), अद्यावत भाजीमंडई या सुविधांची वाणवा आहे. अद्यावत टाऊन हॉल, नाट्य मंदिर तसेच कलागुणांना वाव देण्यासाठी थिएटर अगर कला मंदिर असणे आणि त्या दृष्टीने पाठपुरावा करणारा नगरसेवक (Corporator) पाहिजे. कमी पैशात जास्तीत जास्त विकासकामे झाली पाहिजेत. महानगरपालिकेचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढवून महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून दरवर्षी पुढील वर्षासाठी योग्य ते धोरण ठरवले जावे.

- Advertisement -

– कविता आयरे

नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या शाळा (schools), महानगरपालिकेचे हॉस्पिटल (hospital) यांचा बोजवारा उडालेला आहे. नगरसेवक (Corporator) हे जनतेचे सेवक आहेत. मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना निवेदने (memorandum) द्यावी लागतात हे दुर्दैव. नगरसेवकांना व्हिजन असणे गरजेचे आहे. शाळा सुधारण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर काम करणारा नगरसेवक हवा. तसेच वैद्यकीय सेवा (Medical Services) जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोचवता येईल आणि वैद्यकीय उपकरणे कसे उपलब्ध करता येतील यासाठी प्रयत्न करणारा नगरसेवक हवा.

– पुनम आहेर

सरकार झोपडपट्ट्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवते. त्याबाबत नगरसेवकाने नेहमी अपडेट राहिले पाहिजे. त्या योजना आपल्या भागात राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वच्छ चारित्र्याचा व प्रामाणिक, भरपूर मेहनत करण्याची तयारी असलेला नगरसेवक पाहिजे. नगरसेवकाच्या अधिकाराची, तसेच जबाबदारीची सुध्दा जाणीव असणारा व कामकाजाची चांगली माहिती असणारा लोकप्रतिनिधी पाहिजे.

– सचिन पाटील

राज्य व केंद्र शासन यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणणे आणि त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नगरसेवकांना असावी.नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी किमान महिनाभरातून एकदा तरी नागरिकांची सर्वसमावेशक अशी वॉर्ड सभा आयोजित करून समस्यांचा आढावा घ्यावा. त्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर महानगरपालिकेद्वारे व्हावे. शहरातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन साफसफाई, स्वच्छता,कचरा व घनकचर्‍याचे निर्मूलन वगैरे सर्व बाबींकडे काटेकारपणे लक्ष द्यावे.

– पंकज कुलकर्णी

- Advertisment -

ताज्या बातम्या