नाशिकनंतर नगर अग्नितांडव : समिती तर नेमली; पण, दोषींवर कारवाई होणार का?

नाशिकनंतर नगर अग्नितांडव : समिती तर नेमली; पण, दोषींवर कारवाई होणार का?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील ((Ahmednagar District Civil Hospital)) अति दक्षता विभागाला ((ICU)) आज सकाळी साडेदहा वाजता शॉक सक्रीटमुळे आग लागली. या विभागात १७ कोवीड रूग्ण दाखल होते. यापैकी ११ रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला...

याबाबतची चौकशी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना नाशिक शहरात (Nashik City) घडली होती.

नाशिक मनपाच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात (Dr. Zakir Hussain Hospital) दि. २१ एप्रिल २०२१ रोजी ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचा दुदैवी मुत्यृ झाला. यामध्ये एकूण १२ पुरूष व १० महिलांचा समावेश आहे. याबाबतदेखील एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करण्यात आली नाही.

एवढा मोठा अवधी उलटूनदेखील नाशिकच्या दुर्दैवी घटनेचे दोषी अजून सापडले नाहीत. शासनाकडून केवळ कठोर कारवाई करू इतकंच बोललं जातं. प्रत्यक्षात मात्र यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. काही काळ लोटला की लोक झालेली घटना विसरून जातात आणि शासनदेखील विसरून जाते.

याबाबत जरी कुणा संबंधिताला निलंबित केलं तरी काही महिन्यांनंतर पुन्हा कामावर रुजू केले जाते ही आजची वस्तुस्थिती आहे. नाशिक व नगर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने आता तरी काही ठोस निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com