धक्कादायक! पाचशे रुपयांसाठी जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या

धक्कादायक! पाचशे रुपयांसाठी जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या

मुंबई | Mumbai

येथील वांद्रे पूर्व परिसरात (Bandra East Area) उधारीचे राहिलेले ५०० रुपये परत मागितल्याने मित्राने आपल्याच मित्राची चाकूने सपासप वार करत हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाजिम इफ्तेकार खान (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर शादाब चांद मोहम्मद खान उर्फ भुरा (२१) आणि शानु चांद मोहम्मद खान (२२) असे आरोपींची (Accused) नावे आहेत. नाजिम इफ्तेकार खान आणि शादाब चांद मोहम्मद खान उर्फ भुरा यांची मागील सहा ते सात महिन्यापासून ओळख होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

काही दिवसांपूर्वी नाजीमचा मोबाईल आरोपीच्या हातातून पडला होता तो दुरुस्त करण्यासाठी एक हजार रुपये इतका खर्च आला तर हा खर्च आरोपी शादाबने देण्याचे कबूल केले, मात्र हजार रुपयांपैकी फक्त पाचशे रुपये आरोपीने नाजीमच्या पत्नीकडे (Wife) दिले. उरलेले पाचशे रुपये मागण्यासाठी आरोपीकडे सतत तगादा लावला होता. याच रागातून त्यांच्यात वांद्रे रेल्वे स्टेशन (Bandra Railway Station) ब्रिजखाली धक्काबुक्की झाली.

धक्कादायक! पाचशे रुपयांसाठी जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या
अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का? शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले "कोणाला काहीही आवडेल पण...

त्यानंतर आरोपीच्या मोठ्या भावाने देखील नाजीमला मारहाण (Beating) केली. त्यावेळी नाझीम तिथून निघून जात असतांना शादाबने नाझीमला खाली खेचले व त्याच्या हातातील चाकूने (Knife) नाझीम यांच्या छातीत भोसकले व तो चाकू त्याचा भाऊ शानु याच्याकडे दिला. या हल्ल्यात नाझीम गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी भाभा रुग्णालयात (Bhabha Hospital) नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच नाजिमचा मृत्यू (Death) झाला.

दरम्यान, यासंदर्भात मृत नाजीमच्या पत्नीचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत पाटील, पोलीस हवालदार शेख, पोलीस नाईक सोनवणे, पोलीस हवलदार पवार पोलीस नाईक वाघमारे व पोलीस शिपाई कोयंडे यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत त्यांना एका तासाच्या आत ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी हा खून केल्याचे कबूल केले. यानंतर आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी (Police Custody) ठोठावण्यात आली आहे.

धक्कादायक! पाचशे रुपयांसाठी जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या
रामजन्मभूमी उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक; गर्लफ्रेंडच्या भावाला अडकवण्याच्या उद्देशाने....
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com