संजय राऊतांविरोधात नाशकात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

संजय राऊतांविरोधात नाशकात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

नाशिक | Nashik

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर आता याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात नाशकात गुन्हा दाखल झाला आहे...

शहरातील पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये (Panchvati Police Station) संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. कलम ५०० नुसार खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बदनामी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत चाटूगिरी शब्द वापरल्याने त्यांची बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

संजय राऊतांविरोधात नाशकात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी...

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)हे काल (रविवार) पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी शहा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध. पानी का पानी केले, असे विधान अमित शाह यांनी केले होते.

त्यानंतर शहा यांच्या विधानावर पलटवार कारतांना राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतच आक्षेपार्ह विधान केले होते. यावेळी राऊत म्हणाले होते की, हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती.

संजय राऊतांविरोधात नाशकात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
उद्धव ठाकरेंचे अमित शहांवर टीकेचे बाण; म्हणाले, मोगॅम्बो...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com