Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 'हे' आहे कारण

संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल, ‘हे’ आहे कारण

बीड | Beed

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे अलीकडे चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. शिंदे-फडणवीस एकत्र आल्यानंतर संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये जास्तच वाढ झालेली आहे. ई.डी. चौकशी (E.D. inquiry) त्यांनतर झालेली अटक यामुळे संजय राऊत चर्चेत आहेत.

- Advertisement -

अलीकडे राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे आरोप करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते, त्यात त्यांनी श्रीकांत शिंदेंवर (Shrikant Shinde) गंभीर आरोप करत खासदार शिंदे यांनी एका गुंडाला सुपारी दिली आहे, असा आशय पत्रात नोंद केला होता. त्यामुळे शिंदे गटाचे समर्थक संजय राऊत यांच्यावर भडकले होते.

जितेंद्र आव्हाड यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणामुळे वाढणार डोकेदुखी

दरम्यान संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांची यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून (Police Administration) चौकशीही करण्यात आली, राऊत यांच्या आरोपामुळे नाशिकमधील शिंदे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले बघायला मिळाले.

या सर्व तापलेल्या राजकीय पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात (Beed City Police Station) गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

टेकऑफवेळी विमान आदळलं धावपट्टीवर अन् पुढे घडलं असं काही…

कल्याण लोकसभेचे (Kalyan Lok Sabha) खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील राजा ठाकूर यांना माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. संजय राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या