रेमंड कामगार संपप्रकरणी या माजी महापौरांवर गुन्हा दाखल

रेमंड कंपनी जळगाव
रेमंड कंपनी जळगाव

जळगाव- jalgaon

कंपनीने केलेली वेतनवाढ मान्य नसल्यामुळे रेमंड कंपनीतील (Raymond company) कामगारांनी संप (workers strike) पुकारला आहे. त्यामुळे कंपनीचे कामकाज २४ तारखेपासून बंद असून कंपनीच्या ५० मीटरच्या आवारात कुणीही गर्दी करू नये असे आदेश औदयोगिक न्यायालयाने (Industrial Court) दिले आहेत. तरी देखील  माजी महापौर ललित कोल्हेसह (former mayor Lalit Kolhe) पाच ते सहा जणांनी गैरकायदयाची मंडळी जमवून न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

रेमंड कंपनी जळगाव
बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..

रेमंड कंपनीचे प्रभारी मुख्य प्रबंधक प्रफुल्ल दत्तात्रय गोडसे यांनी फिर्यादीनुसार, माजी महापौर ललित कोल्हे व पाच ते सहा जण मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीच्या ५० मीटरच्या आत येवून कामबंद आंदोलनाबाबत मीडियातील काही प्रतिनिधींना माहिती देत होते. यासंदर्भात सिक्युरिटी इन्चार्ज गिरधारी कुर्वे यांना गोडसे यांना कळविले. त्यानंतर कुर्वे यांनी कोल्हे यांना समजावून सांगून कंपनीच्या ५० मीटर बाहेर जाऊन माहिती द्या असे सांगितले.

रेमंड कंपनी जळगाव
25 कोटींची पाणी पुरवठा योजना तरीही वरणगावकरांच्या नशिबी पाणी टंचाईच...
रेमंड कंपनी जळगाव
रेमंड बंदसाठी खान्देश युनियनच जबाबदार ?

त्यावर आपण कुठलेही आंदोलन करत नसल्याचे सांगत कोल्हे व इतर लोक ५० मीटरच्या आतच थांबून राहिले. हा प्रकार कुर्वे यांनी गोडसे यांना कळविला. त्यानंतर रात्री गोडसे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून गैरकायदयाची मंडळी जमविल्याप्रकरणी माजी महापौर ललित कोल्हेंसह पाच ते सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेमंड कंपनी जळगाव
बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com