कारची दुचाकीला धडक; दोन वृद्धांचा मृत्यू

कारची दुचाकीला धडक; दोन वृद्धांचा मृत्यू

सिन्नर। अमोल निरगुडे Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावरील( Nashik-Pune Highway) सिन्नर बायपासवर कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन वृद्ध ठार झाल्याची घटना आज (दि.16) सुमारास घडली.

भास्कर खंडू तुंगार (63) व शंकर महादू सोनवणे (69) दोघे रा. शिंदे ता. नाशिक हे आपल्या दुचाकीने तालुक्यातील मनेगाव येथे नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी जात होते. बायपासवरून मनेगाव फाट्यावरुन वळत असताना पाठीमागून आलेल्या कार क्र. एम. एच. 15/ एच. जी. 7692 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात दोन्ही वृद्ध रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. यात दोन्ही वृध्दांच्या डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही वृद्धांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनवणे यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत खैरनार यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तर तुंगार यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात( Sinnar Police Station) कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक चेतन मोरे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com