कारची बैलगाडीला जोरदार धडक; सात जखमी; एका बैलाचा जागीच मृत्यू

कारची बैलगाडीला जोरदार धडक; सात जखमी; एका बैलाचा जागीच मृत्यू

घोटी | जाकीर शेख Ghoti

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway )नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना माणिकखांब जवळ कारने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.

धडक दिल्यानंतर कार उलटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात बैलगाडीमधील तीन ते चार जण जखमी झाले आहेत. कारमधील तीन जण जखमी झाले आहेत. एका बैलाचा यात मृत्यू झाला असून बैलगाडीचा चक्काचूर झाला आहे.

मदतीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सर्व जखमींना वाहतूक पोलिसांनी रूट पेट्रोलिंग टीमचे मोना भडांगे, दीपक मावरिया, विजय कुंडगर, सूरज आव्हाड, रवी दुर्गुडे यांच्या मदतीने घोटी टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिंद्रा कंपनीतील अधिकारी जयंत इंगळे, सुरक्षा अधिकारी हरीश चौबे, मनोज भडांगे, ए. डी. सोनवणे यांनीही मदतकार्य केले. महामार्ग पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी आपल्या पथकासह वाहतूक सुरळीत केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com