बिबट्यासाठी लावला पिंजरा अन् पुढे घडले असे काही...

बिबट्यासाठी लावला पिंजरा अन् पुढे घडले असे काही...

देवळाली कॅम्प | Devlali Camp

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या (Cantonment Board) पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या पंपिंग स्टेशन जवळ लावलेल्या पिंजऱ्यात (cage) उदमांजर अडकले असून यात बिबट्या (Leopard) कधी अडकतो लक्ष लागून आहे.

तेथील पंपिंग स्टेशन (pumping station) परिसरात वर्षभर बिबट्यांचा वावर असतो, गेल्या महिन्याभरात दोन वेळा बिबट्या जेरबंद करण्यात आले आहे. तरी देखील बिबट्यांचा वावर सुरूच आहे.

दारणा निदीचे (darna river) पात्र व लगतच लष्करी जंगल (Military forest), उसाची शेती (Sugarcane farming) यामुळे बिबट्यांना लपण्यास व फिरण्यास मुक्त क्षेत्र झालेले आहे. या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंपिंग वर काम करणाऱ्या कर्मचारी व आजूबाजूतील विभागातील शेतकरी (farmers) सायंकाळ नंतर घराबाहेर पडण्यास दज होत नाही.

त्यातच थंडीचा (cold) महिना असल्याने अंदाज देखील लवकर पडतो वाढलेली झाडे झुडपे त्यातून मार्गक्रमण करत कर्मचाऱ्यांना पंपिंग स्टेशनवर जावे लागते ही बाब अतिशय धोकादायक असून कर्मचाऱ्यांच्या जीवितास मोठा धोका पोहोचू शकतो या ठिकाणी वन विभागाने (Forest Department) मळे परिसर व कर्मचाऱ्यांच्या मागणी अनुसार लावलेले पिंजऱ्यात उदमांजर अडकले असून बिबट्या कधी बंद होणार याकडे या परिसराचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com