Friday, April 26, 2024
Homeजळगावतीनशे रूपयांची लाच 'मनिषा'ला घेवून गेली गजाआड

तीनशे रूपयांची लाच ‘मनिषा’ला घेवून गेली गजाआड

भुसावळ bhusaval । प्रतिनिधी

इंडेक्स टू अर्थात सातबाराच्या उतार्‍यावर खरेदीदाराचे नाव नोंद करण्यासाठी खडका महिला तलाठी (women Talathi) मनिषा निलेश गायकवाड यांनी अवघ्या तीनशे रूपयांच्या लाचेची (bribe) मागणी केल्याने या संदर्भात लाचलुचपत विभागाने त्यांना ताब्यात घेतल्याची घटना खडका ता.भुसावळ येथे घडल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअपPhotos # गोद्री कुंभाच्या समारोपाप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे मोठे वक्तव्यBeauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…

अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी सजा खडका हद्दीमध्ये प्लॉट खरेदी केलेला आहे त्यामुळे तक्रारदार हे सदर प्लॉटचे इंडेक्स-2 व खरेदीखत घेऊन 7/12 उतार्‍यावर नाव लावणेसाठीच्या तलाठी, सजा खडका व साकरी कार्यालयात अर्ज केला असता वरील तालाठी यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे नाव लावण्याच्या मोबदल्यात यांचेकडे पंचासमक्ष 300 रुपये लाचेची मागणी केले.

ही लाच रक्कम पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना तलाठी कार्यालय खडका येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई शशिकांत पाटील पोलिस उप अधीक्षक सहसापळा अधिकारी व पथकात संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, शैला धनगर, ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांचा समावेश होता. तर याकामी सुरेश पाटील, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांचे सहकार्य मिळाले.

‘फॅशन शो’च्या रॅम्पवर विद्यार्थिनींचा जलवा

- Advertisment -

ताज्या बातम्या