Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदाबाबत मोठा निर्णय

शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदाबाबत मोठा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र राज्यात ( Maharashtra State ) शिवसेनेच्या आमदारांच्या बंडाळी ( rebellion in shivsena )नंतर सत्तांतर झाले. दरम्यान आज विधानसभा अध्यक्षांची निवड झाली.आज विधिमंडळ गटनेते पदाबाबत विधिमंडळ सचिवालयाने मोठा निर्णय दिल्याचे समजते.

- Advertisement -

दरम्यान राजकीय घडामोडी चालू असलेल्या काळात बंडखोर आमदार बाहेर पडल्यानंतर त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरुन काढलं होतं. मात्र यावेळीही एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदाचा दावा केला होता. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानण्यात येतो आहे.

काही वेळापूर्वीच हा निर्णय पारित करण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवालयानं (Legislative Secretariat) याला मान्यता दिली आहे. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे आता गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आणि शिवसेनेते सुनील प्रभूंना दिलेलं मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील वादावर अभ्यास करून दिला मोठा निर्णय दिला आहे.

शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या व्हिप वॅारमध्ये अखेर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना विधिमंडळ गट नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना मान्यांत दिली आहे. तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसलां आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे विधिमंडळ गट नेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनिल प्रभू यांची मान्यता विधिमंडळ सचिवालयाने रद्द केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या