Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामहासभेत डॉक्टर भरतीबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

महासभेत डॉक्टर भरतीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेत (Nashik NMC) सध्या प्रशासक राजवट सुरू आहे तर कायद्यानुसार नियमित महासभा तसेच समितीची सभा घेण्याच्या अधिकार महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना आहे…

- Advertisement -

त्यामुळे आज अचानक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी महासभा (Mahasabha) घेत विविध विकास कामांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे 44 डॉक्टर भरतीला (Doctor recruitment) देखील मान्यता देण्यात आली.

महासभेने मानधनावर (honorarium) ४४ डॉक्टरांच्या भरतीला मंजुरी दिली. आरक्षणानूसार ही भरती केली जाणार असून त्यासाठी भरतीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. मनपा रुग्णालयांत ४४ डॉक्टर व इतर वैद्यकीय स्टाफ उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जिवाशी हेळसांड सुरु आहे.

गंगापूर रोडवर ‘द बर्निंग इलेक्ट्रिक बाईक’चा थरार

महापालिकेत १८९ इतक्या डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी आजमितीस केवळ ६५ डॉक्टरांवरच मनपा आरोग्यसेवेचा भार आहे. तब्बल १२४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मानधनावर ४४ डॉक्टर भरती करावी ही मागणी केली जात होती. तत्कालीन आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी राबवलेली भरती प्रक्रिया विद्यमान आयुक्त ४४ डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रद्द केली.

नाशकात पुन्हा जोर’धार’, पाहा फोटो…

बिंदूनामावलीनूसार ही भरती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानूसार वैद्यकीय आरोग्य विभागाने ४४ डॉक्टर भरतीचा प्रस्ताव तयार केला व तो मंजुरीसाठी महासभेकडे पाठवला. त्यात दहा एमबीबीएस व ३५ स्पेशलिस्ट डॉक्टरांच्या समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) हे उद्या महापालिकेला भेट देणार असून विविध विकास प्रकल्प व रेंगाळलेले प्रश्नांचा आढावा घेणार आहे.

Navratrotsav 2022 : नाशिकमधील ‘या’ दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर…

त्यापार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने गुरुवारी महासभा बोलावत मानधनावर डॉक्टर भरतीला मंजुरी दिली. ही ४४ जागांची भरती आरक्षण कोट्यानूसार केली जाणार असून त्यासाठी हा प्रस्ताव प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. पुढिल एक महिन्यात ही प्रक्रिया मार्गी ल‍ागून डॉक्टर भरतीची जाहिरात काढली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या