अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा

ग्रामीण पोलीस अधीक्षक उमाप यांची धडाकेबाज कामगिरी
अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Nashik Rural Superintendent of Police Shahaji Umap) यांनी अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच अवैध व्यावसायिकांचे( Illegal Traders ) धाबे दणाणले असून केवळ २३ दिवसांत ३२१ गुन्हे दाखल करून १ कोटी ४५ लाख १८ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

नाशिक ग्रामीण हद्दीत पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हातात घेताच अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलत दारूबंदी ,जुगार,एनडीपीएस,अवैध गुटखा विक्री,अवैध बायोडिझेल,अवैध वाळू वाहतूक,अवैध अग्निशस्त्रे बाळगणे,हॉटेल व ढाबा अशी कारवाई करून ३२१ गुन्हे दाखल करत ३७० संशयितांवर कारवाई करून गुन्ह्यात १ कोटी ४५ लाख १८ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आवाहन केले आहे कि, नाशिक जिल्हयात चालणाऱ्या अवैध व्यवसायाविषयी नागरिकांना काही माहिती द्यावयाची असल्यास हेल्पलाईन क्रमांक क्रमांक 6262 250363 संपर्क साधावा तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com