Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात पावसामुळे ९९ बळी; नाशकात 'इतके' दगावले

राज्यात पावसामुळे ९९ बळी; नाशकात ‘इतके’ दगावले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच धरणातील (Dam) जलसाठ्यातदेखील वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग (Water Discharged) सुरु आहे…

- Advertisement -

अनेक ठिकाणी पुर (Flood) आले असून अजूनही पूरस्थिती (Flood) कायम आहे. तसेच आजपासून चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या महिन्याभरात पावसामुळे 99 जणांचा बळी गेला आहे. गेल्या 24 तासांत 4 जणांनी जीव गमावला आहे. तर नाशिकमध्ये (Nashik) आतापर्यंत नऊ जण वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. तसेच नाशिकमध्ये पावसामुळे (Rain) भातशेती, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तसेच महिन्याभरात 181 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जीवितहानी टाळण्यासाठी पुराच्या ठिकाणी एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) तैनात करण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यात आठ दिवसात 35 लोकांचा पावसामुळे (Rain) बळी गेला आहे. तर साडेतीनशेहून अधिक जनावरे वाहून गेली आहेत. मृत व्यक्तींमध्ये 24 जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर 9 जणांचा मृत्यू पुरात वाहून गेल्यामुळे झाला. पावसामुळे 6 हजार हेक्टर वरच्या पिकांना फटका बसल्याचे समजते.

नाशिक जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या पावसामुळे नऊ जण आतापर्यंत वाहून गेले आहेत. आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे सुरगाणा (surgana), पेठ (Peth) आणि चांदवड (Chandwad) तालुक्यात 10 जनावरे दगावली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या