Photo Gallery : नाशिकच्या गुलाबी थंडीत निघाली संमेलनाची ग्रंथदिंडी

Photo Gallery : नाशिकच्या गुलाबी थंडीत 
निघाली संमेलनाची ग्रंथदिंडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

साहित्य रसिकांचा मेळा आजपासून कुसुमाग्रज नगरीत (Kusumagraj Nagari) रंगणार आहे. शहराच्या वेशीवर असलेले मेट भुजबळ नॉलेज सिटी हे विविधांगी कलाकृतींनी नटलेले आहे...

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Saammelan) निमित्ताने देशातील महत्वाचे साहित्यिक, लोकप्रतिनिधी आणि रसिकांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास संमेलनाच्या ग्रंथदिंडीस कुसुमाग्रज निवासस्थान येथून लवकर प्रारंभ होणार आहे. पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छ्गन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, महापौर सतीश कुलकर्णी, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, शंकर बोर्‍हाडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित आहेत. या दिंडीत अनेक शाळा सहभागी झाल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, विठ्ठल रुख्मिणी, वासुदेव, नटसम्राट, वारकरी संप्रदाय अशा वेशभूषा परिधान करून नागरिक या दिंडीत सहभागी झाले आहेत.

तसेच शहरातील अनेक शाळांनी या दिंडीत उत्साहाने सहभागी झाल्या आहेत. दिंडीत एकीकडे मल्लखमचे प्रात्यक्षिक सुरू आहे. तर दुसरीकडे लेझिम पथक ग्रंथदिंडीची शोभा वाढवत आहे.

मुख्य आकर्षण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचा या दिंडीत समावेश करण्यात आला आहे. नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनने या दिंडीत सायकल रॅली काढली आहे.

याशिवाय अनेक कार्यक्रमांचा समावेश या ग्रंथदिंडीत आहे. शहरातील अनेक नागरिकांनी या ग्रंथ दिंडीत सहभाग नोंदवला आहे.

ग्रंथदिंडी महापौर बंगला येथून रेमंड सिग्नलला उजवीकडे वळणार आहे. नंतर जुन्या सीबीएसचा सिग्नल ओलांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड, नाशिक जिमखाना, सागरमल मोदी शाळा, सारडा कन्या शाळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृहवरून सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथदिंडी विसावा घेईल असा या ग्रंथ दिंडीचा मार्ग आहे. त्यानंतर दिंडी कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com