भीषण अग्नितांडवात ९ भारतीयांचा होरपळून मृत्यू

भीषण अग्नितांडवात ९ भारतीयांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

मालदीवची (Maldives) राजधानी माले येथे विदेशी कामगारांच्या घरांना लागलेल्या भीषण आगीत (Fire) ९ जणांचा होरपळून मृत्यू (Death) झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये नऊ भारतीयांचा समावेश आहे. तसेच मालदीवमधील भारतीय उच्चयुक्त कार्यालयाकडूनही (Indian High Commission) याबाबतचे एक ट्वीट करण्यात आले आहे. याशिवाय ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास लागले. मालेमधील भारतीय उच्चायुक्तांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दोन हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

दरम्यान, ज्या ठिकाणी ही आग लागली ते एक अपमार्केट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. हे जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. तसेच आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com