सोनगीर फाट्यानजीक 89 तलवारी, एक खंजीर जप्त

सोनगीर फाट्यानजीक 89 तलवारी, एक खंजीर जप्त

सात लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त; चौघांना अटक, सोनगीर पोलिसांची कारवाई

धुळे । Dhule । प्रतिनिधी

सोनगीर (Songir) पोलिसांनी मुंबई - आग्रा महामार्गावर एका स्कॉर्पीओचा (Scorpio) पाठलाग करुन वाहनामधील 89 तलवारी (sword) आणि एक खंजीर (dagger) जप्त केला आहे. याप्रकरणी जालना (jalna) येथील चौघांना अटक करण्यात आली आहे.

सोनगीर (Songir) पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आज सकाळी गस्त घालत असतांना मुंबई-आग्रा महामार्गावर वाघाडी फाट्यानजीक, शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने एम.एच.09 सी.एम.0015 क्रमांकाची काळ्या रंगाची काच असलेली स्कॉर्पीओ (Scorpio) भरधाव वेगाने जातांना दिसून आली. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्कॉर्पीओचा (Scorpio) पाठलाग करुन वाहन थांबविण्याचा चालकाला इशारा दिला मात्र त्यानंतर चालकाने वाहन भरधाव वेगाने नेली.

पोलिसांनी पुन्हा पाठलाग करुन सोनगीर फाट्याजवळ स्कॉर्पीओला (Scorpio) ओव्हरटेक करुन गाडी थांबविली. वाहनामध्ये चार जण होते. त्यांची विचारपुस केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय आणखी बळावला. स्कॉर्पीओची तपासणी केली असता त्यात 89 तलवारी आणि एक खंजीर आढळून आला. पोलिसांनी वाहनासह 7 लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी मोहम्मद शरीफ मोहम्मद शफीक (वय 35), शेख इलीयाज शेख लतीफ (वय 32) दोघे रा.सिध्दार्थ नगर, वैशाली किराणा जवळ, जालना, सैय्यद नईम, सैय्यद रहीम (वय 29) रा.सुंंदरनगर, एसटी वर्क शॉपच्या मागे जालना, कपील विष्णू दाभाडे (वय 35) रा.पंचशील नगर, बुध्द विहार जवळ, जालना या चौघांना अटक करण्यात आली. सोनगीर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 मोटर वाहन कायदा कलम 184, 239, /177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

सदर कारवाई पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चंद्रकांत पाटील, हे.कॉ.शामराव अहिरे, पोना ईश्वर सोनवणे, पो.कॉ.सुरज साळवे यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.