Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशनाशिकच्या HAL साठी ४८ हजार कोटींचा प्रकल्प : ८३ तेजस फायटरची निर्मिती

नाशिकच्या HAL साठी ४८ हजार कोटींचा प्रकल्प : ८३ तेजस फायटरची निर्मिती

नवी दिल्ली

चीन आणि पाकिस्तानशी सुरु असलेल्या वादानंतर आज केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा नाशिक व बेंगलुरुमधील हिंदुस्थान हिन्दुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला होणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय कॅबिनेटने आज झालेल्या बैठकीत ८३ तेजस फायटर जेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ४८ हजार कोटींच्या या खरेदीस मान्यता देण्यात आली. हे सर्व फाइटर जेट हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये तयार होणार आहे. लाइट कॉम्बैट एयरक्राफ्ट (LCA) 1A तेजस फाइटर तयार करण्यासाठी नासिक व बेंगलुरुमध्ये सेटअप तयार करण्यात आला आहे. तेजसमध्ये ६० % स्वदेशी उपकरण व तंत्रज्ञान असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या