उत्तर महाराष्ट्रातील ८३ टक्के रुग्ण नगर जिल्ह्यात

उत्तर महाराष्ट्रातील ८३ टक्के रुग्ण नगर जिल्ह्यात

नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात कोरोनाचे ५५०४ रुग्ण आहेत. त्यातील ४६०१ रुग्ण केवळ नगर(nagar) जिल्ह्यातील आहेत. उर्वरित चार जिल्ह्यात ९०१ रुग्ण आहे. खान्देशातील (khandesh)ती जिल्ह्यात ५९ रुग्ण आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील ८३ टक्के रुग्ण नगर जिल्ह्यात
भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, किरीट सोमय्यांंचा दावा

उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली तरी नगर जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहे. २४ ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्यात ४६०१ रुग्ण आहे. ही रुग्णसंख्या ८३ टक्के आहे. नगर नंतर सर्वात नाशिक जिल्ह्यात (nashik)

खान्देशातदुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे खान्देशची (khandesh)वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. खान्देशात नंदुरबार (nandurbar) जिल्हा व धुळे (dhule) शहर कोरोनामुक्त झाला आहे. जळगावात (jalgaon) फक्त ३७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. गेल्या महिन्याभरापासून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात एकही कोरोना मृत्यू झालेला नाही.

नंदुरबारमध्ये ८ जूननंतर कोरोनामृत्यू नाही. जळगावात १६ जुलैनंतर एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. धुळ्यात ८ जुलैपासून एकही मृत्यू नाही. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी खान्देशातील तीन जिल्ह्यात महिन्याभरापासून एकही मृत्यू नसल्याचे सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय रुग्ण (२४ ऑगस्ट)

नाशिक -८४८

नगर -४६०१

जळगाव- ३७

नंदुरबार-१

धुळे- २१

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com