Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपतर्फे 82 तीर्थक्षेत्री कार्यक्रम

भाजपतर्फे 82 तीर्थक्षेत्री कार्यक्रम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते पाडव्याच्या (padwa) मुहूर्तावर श्री क्षेत्र केदारनाथ (kedarnath) येथे श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या (Shrimad Adya Shankaracharya) समाधीचे व मूर्तीचे अनावरण (Unveiling of the statue) झाले.

- Advertisement -

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून त्र्यंबकेश्वर (trambakeshwar) येथे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis), केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister Dr. Bharti Pawar), कपिल पाटील, खा. डॉ. प्रीतम मुंडे (mp dr. pritam mundhe) यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. भाजपतर्फे (bjp) देशभर 82 तीर्थक्षेत्री कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

यावेळी भाजप नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे (girish palve), प्रदेश सरचिटणीस देवयानी फरांदे (Devyani Farande), प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप (balasaheb sanap), महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni), प्रदेश पॅनलिस्ट लक्ष्मण सावजी (laxman savji), ग्रामीण सरचिटणीस सुनील बच्छाव, शहर सरचिटणीस जगन पाटील, आ. राहुल ढिकले (mla rahul dhikle), ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर, उद्योग आघाडी प्रदेश संयोजक प्रदीप पेशकर,

आध्यात्मिक आघाडी प्रदेश संयोजक तुषार भोसले, तसेच निरंजन आखाडा, जुना आखाडा, बडा आखाडा, अग्नी आखाडा, आनंद आखाडा, निर्मल आखाडा, दशनम जुना आखाडा, आवहन आखाडा, अटळ आखाडा, महानिर्वाण आखाडा, नाथ आखाडा आदी आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत दर्शन घेऊन पूजाअर्चा केली व त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) येथील आवारात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारधाम येथील लाईव्ह प्रसारण कार्यक्रमात (Live broadcast program) सहभागी झाले. या प्रसारणात या कार्यक्रमानिमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला तसेच 12 ज्योतिर्लिंग अशा देशभरातील 82 तीर्थक्षेत्री भारतीय जनता पार्टीतर्फे देशव्यापी कार्यक्रम झाले.

डॉ. पवार, फडणवीस यांची जनजागृती

केंद्र सरकारने केलेल्या आवाहनानुसार ‘हर घर टीका, हर घर दस्तक’ कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्याचे (nashik district) शंभर टक्के लसीकरण (hundred percent vaccination) पूर्ण करण्यासाठी आता लसीकरणापासून (vaccination) वंचित राहिलेल्या प्रत्येक गावातील लोकांची यादी तयार करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

प्रत्येक गावात करोना प्रतिबंधक लसीकरणाचे (Corona preventive vaccination) सूक्ष्म नियोजन (Micro planning) करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील काही घरांमध्ये जाऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या लसीकरणाच्या पथकाने घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लोकांना लसीकरणाबाबत जनजागृती केली.

प्रत्यक्ष लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरणाबद्दल जनजागृती करून सर्व स्तरावर लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भारती पवार व देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीयमंत्री कपिल पाटील, खा. प्रीतम मुंडे यांनी गावातील घरांमध्ये जाऊन लोकांना लसीकरणाबाबत जनजागृती केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या