Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या१२ सप्टेंबरपासून ८० रेल्वे सुरु होणार

१२ सप्टेंबरपासून ८० रेल्वे सुरु होणार

नवी दिल्ली :

गेले ५ महिने करोनाने देशाभरात थैमान घातले आहे. यामुळे मार्चपासून देशात लॉकडाऊन करण्यात आला. आता अनलॉकचा चौथा टप्पा सुरु असताना ८० रेल्वे गाड्या सुरु होणार आहेत.

- Advertisement -

लॉकडाउनमुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे बंद आहे. ती कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून रेल्वेनेच याबाबतची माहिती दिली आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता ४० अप व डाऊन म्हणजे ८० रेल्वेही सुरु होणार आहेत. १२ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या गाड्यांसाठी १० सप्टेंबरपासून आरक्षण सुरु होणार आहे. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोदकुमार यादव यांनी टि्वट करुन ही माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या