Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपवारांच्या उपस्थितीत विरोधकांची बैठक सुरु, कोण आहेत उपस्थित?

पवारांच्या उपस्थितीत विरोधकांची बैठक सुरु, कोण आहेत उपस्थित?

नवी दिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज विरोधी पक्षातील नेत्यांसोबत बोलवलेल्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते आणि काही पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत.

- Advertisement -

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब या राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुका आणि २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. ‘राष्ट्र मंच’ चे संयोजक यशवंत सिन्हा यांनी ही बैठक आयोजित करण्याची विनंती शरद पवार यांना केली होती.

भाजपतून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले यशवंत सिन्हा,सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम, काँग्रेसमधून निलंबन झालेले संजय झा, अरुण कुमार, घनश्याम तिवारी, माजिद मेमन, वंदना चव्हाण, माजी आयएएस अधिकारी, नितिश कुमार यांचे माजी सल्लागार आणि राज्यसभेचे माजी खासदार पवन वर्मा, ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे छत्तीसगडमधून राज्यसभेचे खासदार के.टी.एस तुलसी, आपचे खासदार सुशील गुप्ता उपस्थित आहेत.

बैठकीला केवळ राजकीय नेत्यांचीच उपस्थिती नाहीये. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, इराणमध्ये भारताचे निवृत्त राजदूत के.सी.सिंह, सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि मानवी हक्क लॉ नेटवर्क संस्थेचे संस्थाचालक कॉलिन गोन्साल्विस, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी, कवी, चित्रकार, पत्रकार आणि १९९८ शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेले प्रितिश नंदी, रविंदर मनचंदा, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, सीपीएमचे माजी खासदार निलोलपल बासू, निवृत्त न्यायमूर्ती एपी शहा उपस्थित आहेत.

रजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या महिन्याच्या सुरुवातीला प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा भेट झाली होती. विरोधी पक्षासोबत बैठक करण्यापूर्वी शरद पवार दिल्लीत एनसीपीच्या राष्ट्रीय कार्यसमिती सोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत विविध अजेंडावर चर्चा केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या