Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशभरधाव ट्रेनचे डब्बे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी

भरधाव ट्रेनचे डब्बे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी

पाली | Pali

राजस्थानमधील पाली येथे वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. वांद्रेहून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. ही घटना पाली येथील राजकीयवासाजवळ घडली.

- Advertisement -

सोमवारी रात्री साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून १० प्रवाशी जखमी झाले आहेत. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, “गाडी मारवाड जंक्शन येथून निघताच अचानक व्हायब्रेशन सुरू झाले आणि काही मिनिटाच गाडी थांबली. आम्ही खाली उतरू बघताच गाडीचे काही डब्बे रुळावरून घसरले होते”, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या