राज्यभरात एसटीच्या ७८० चालकांचा गौरव

राज्यभरात एसटीच्या ७८० चालकांचा गौरव

मुंबई | Mumbai

एसटी महामंडळातर्फे (ST Corporation) २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day) औचित्य साधून आपल्या एकूण सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विना अपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्नीक सत्कार (Felicitation) करण्यात आला...

मध्यवर्ती कार्यालयात उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश देत २५ वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या अशोक पालवे, सिध्दार्थ जाधव व शिवशरणप्पा चौधरी या चालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यभरात प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये (Divisional Office) उर्वरित चालकांचा सत्कार विभाग नियंत्रक यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रसंगी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक वाहतूक शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक कर्मचारी वर्ग अजित गायकवाड, महाव्यवस्थापक नियोजन व पणन जयेश बामणे महाव्यवस्थापक भांडार खरेदी दिलीपकुमार चौधरी मुख्य सांख्यिकी अधिकारी श्रीमती संध्या भंडारवार, उपमुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी सोमनाथ तिकोटकर यांच्या सह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com