राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७८ टक्के मतदान

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील विविध १५ जिल्ह्यांमधील ६२ तालुक्यातील २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत ( Grampanchayat Elections )प्राथमिक अंदाजानुसार गुरुवारी सरासरी सुमारे ७८ टक्के मतदान झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने( State Election Commission ) २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची २९ जून २०२२ रोजी घोषणा केली होती. त्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात २३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सर्व ठिकाणी मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी

नाशिक – ३६, धुळे- ४१, जळगाव – २०, अहमदनगर – १३, पुणे – १७, सोलापूर – २५, सातारा – ७, सांगली – १, औरंगाबाद – १६, बीड – १३, परभणी – २, उस्मानाबाद – ९, जालना – २७, लातूर – ६, बुलढाणा – ५

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *