‘कवच कुंडल’ मोहिमेत 77 टक्के लसीकरण

‘कवच कुंडल’ मोहिमेत 77 टक्के लसीकरण

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

शहरासह जिल्हाभरात सध्या करोना corona विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी तीन तालुक्यांमध्ये धोका आहे. त्यामुळे याठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. जसजसे लसीकरण होईल तसा हा धोका कमी होणार असल्याने राज्यभर कवच कुंडल मोहीम kavach- kundal Campaign 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 3 लाख 83 हजार 845 नागरिकांनी लस घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे लसीकरण हे जवळपास 77 टक्के एवढे झाले आहे.

राज्य शासनातर्फे करोना प्रतिबंध लस उपलब्ध होऊन 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान कवच कुंडल मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण शंभर टक्के होण्याच्या हेतुने शहरी व ग्रामीण मिशन भागात राबविण्यात आले. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी होवून लसीकरण करण्याचे आवाहन देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले होते.

मोहीम यशस्वी करण्यासाठी नाशिक, मालेगाव महानगर पालिकेसह सर्व शहरी, ग्रामीण भागातील गाव, पाडे या अंतर्गत कोविड लसीकरण मोहीमही आता मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले होते. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे पहिला डोस व दुसरा डोस घेऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, यांच्या सहकार्याने वरील कालावधीमध्ये सर्व गावांमध्ये तीन दिवस आधी पूर्वसूचना दवंडी व लाऊड स्पीकरवरून माहिती देण्यात आली; त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या लसीकरणाचे नियोजन सोयीनुसार केले. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना अत्यंत सूक्ष्म नियोजन देऊन पहिला व दुसरा डोस दिला गेला.

सर्व विभागांच्या मदतीने ही मोहीम चांगल्या पद्धतीने पार पडली आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढा देण्यासाठी लस अत्यंत उपयुक्त आहे. अजूनही ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी प्राधान्याने करून घ्यावे.

गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी लसीकरण

Related Stories

No stories found.