Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत सरासरी ७४ टक्के मतदान

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत सरासरी ७४ टक्के मतदान

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यातील विविध १८ जिल्ह्यांमधील १ हजार ७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ( Grampanchayat Elections ) प्राथमिक अंदाजानुसार रविवारी सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.या सर्व ठिकाणी उद्या, सोमवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाने १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात १ हजार ७९ ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळत मतदान झाले.

दुपारी साडेतीन पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी ६४.८३ टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.

.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- १३४, पालघर- ३३६, रायगड- १६, रत्नागिरी- ४६, सिंधुदुर्ग- ४, नाशिक- १८७, नंदुरबार- २००, पुणे- १, सातारा- ४, कोल्हापूर- ३, अमरावती- १, वाशीम- १, नागपूर- १५, वर्धा- ९, चंद्रपूर- ९२, भंडारा- १९, गोंदिया- ५ आणि गडचिरोली- १६. एकूण- १०७९

- Advertisment -

ताज्या बातम्या