7 हजार पोलिसांच्या जागा भरणार: भरतीचे अधिकार जिल्हा पोलिस प्रमुखांकडे

मानवंदना देताना पोलिस दल
मानवंदना देताना पोलिस दल

कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील दोन वर्षात फूलटाईम भरती न झाल्याने पोलिसांवरील वाढलेला दबाव पाहता गृहखात्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ७२०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार आहे. (Home Minister Dilip Walse)

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मंत्रीमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यातील पोलीस दलात 7 हजार 200 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

टीईटी, लष्कर आणि आरोग्य परीक्षांमध्ये समोर आलेल्या घोटाळ्यांमुळे गृह खातं स्वतच ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे. यासाठी कोणत्याही एजन्सीला कंत्राट देणार नसल्याची माहिती गृहमंत्रालयाने सांगितलेे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com