Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याफार्मसी परीक्षेसाठी ७० टक्के अभ्यासक्रम

फार्मसी परीक्षेसाठी ७० टक्के अभ्यासक्रम

नाशिक । प्रतिनिधी

अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चरसह इतर काही अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचे वर्ग जानेवारी महिन्यात सुरू झाले. त्यांचा पूर्ण अभ्यासक्रम आत्ताच संपणे शक्य नसल्याने त्यांची परीक्षा 70 टक्के अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे.

- Advertisement -

तर इतर सर्व कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अभ्यासक्रमाची परीक्षा देण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 11 एप्रिलपासून प्रथम सत्र परीक्षा सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने तयारी सुरू केली असून, ऑनलाइन परीक्षेसाठी एजन्सी निवडणे, प्रश्नसंच तयार करणे याची प्रक्रिया सुरू आहे. करोनामुळे अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची प्रवेश परीक्षा जानेवारीपर्यंत सुरू होती. त्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे वर्ग उशिरा सुरू झाले आहेत.

तर बीए, बीएस्सी, बीकॉम, यासह इतर पारंपरिक अभ्यासक्रमांचे प्रथम वर्ष तसेच पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षापासूनच ऑनलाइन वर्ग ऑगस्ट महिन्यात सुरू झाले होते. त्यांचा अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. पुणे विद्यापीठाने परीक्षेचा निर्णय घेतला असला तरी कोणत्या वर्षासाठी किती अभ्यासक्रम परीक्षेसाठी घ्यायचा याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणार्‍या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर यांचा प्रथम वर्षाचा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम एप्रिल महिन्यापर्यंत संपणे अशक्य आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी शिकवलेल्या 70 टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत. तर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अंतर्गत येणार्‍या हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांची परीक्षा शेवटच्या टप्प्यात मे महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे त्यांचे प्रथम सत्राचे 90 दिवस पूर्ण होत असल्याने त्यांची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे.असे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या